Fri, Apr 26, 2019 01:57होमपेज › Pune › अजित पवारांकडे शिकवणी; मग पहिला विषय ‘सिंचन’चा : रामदास आठवले

अजित पवारांकडे शिकवणी; मग पहिला विषय ‘सिंचन’चा : रामदास आठवले

Published On: May 27 2018 1:20AM | Last Updated: May 27 2018 1:15AMपुणे : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठे नेते अजित पवारांकडे शिकवणी लावल्यास पहिला विषय ‘सिंचन’चा येईल, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्या उपरोधिक सल्ल्याचा समाचार घेतला. 

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने एकत्र लढविल्यास विधानसभेत अडीचशेचा टप्पा सहज गाठता येईल. रिपब्लिकन पार्टीलाही युती हवी असल्याचे संकेत त्यांनी दिले. सत्ताधार्‍यांकडून सत्तेत हवा तसा वाटा मिळत नाही, तरीही आमचा पक्ष आगामी लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढवेल याचा पुनरुच्चार आठवले यांनी केला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) रविवारी होणार्‍या राज्यव्यापी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत खा. रामदास आठवले बोलत होते. भाजप आणि शिवसेनेने एकत्र येणे ही महाराष्ट्राच्या हिताची बाब असून, आपण या दोन पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-सेनेची युती झाली तर 45 ते 46 जागा निवडून येतील. पालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत आमचाच विजय होईल, असा दावाही त्यांनी केला.

निवडणुकीत आरोप होत असतात, त्यामुळे सध्या पालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत होत असलेले आरोप-प्रत्यारोप मनावर घेऊ नका, असा सल्लाही आठवले यांनी दिला. आगामी निवडणुकांमध्ये सेनेने भाजपसोबत युती केली नाही तर सेनेत फूट पडेल, असेही भाकीत अठवले यांनी केले.