Tue, Mar 26, 2019 01:49होमपेज › Pune › रमजाननिमित्त रोजे, तराविह नमाज सुरू

रमजाननिमित्त रोजे, तराविह नमाज सुरू

Published On: May 19 2018 1:35AM | Last Updated: May 19 2018 1:11AMपिंपरी : प्रतिनिधी

मुस्लिम बांधवांचा सर्वात पवित्र मानला जाणारा रमजानचा महिना नुकताच सुरू झाला असून पहिला रोजा (उपवास) शुक्रवारी पहाटे 4 वाजून 36 मिनीटांपासून सूरु झाला.  व सायंकाळी पवित्र वातावरणात रमजान महिन्याचा पहिला उपवास सोडण्यात आला. यानिमित्त शहरात मंगलमय वातावरण होते. 

या महिन्यातील सर्वात मोठी व विशेष महत्व असलेली तरावीहच्या नमाजाला गुरुवारी रात्री पासून सुरवात झाली.  मुस्लिम समाजबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असून बाजारपेठेतही उपवासाचे पदार्थ खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे. याच महिन्यात पवित्र कुराआन अवतरले असल्यामुळे मुस्लिम बांधव महिनाभर नमाज, कुराआन चे पठण करुन अल्लाची इबादत करतात. 

या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव सलग 30 दिवस पहाटे फजरच्या नमजापासून सायंकाळी मगरिबच्या नमाजापर्यंत एकूण 14 तास निर्जल रोजे (उपवास) ठेवतात. फजर, जोहर, असर, मगरिब, ईशा या 5 वेळाच्या नमाज सह तराविह ची विशेष नमजाचे पठण करुन महिनाभर मुस्लिम बांधव अल्लाची ईबादत करीत असतात. 

पहाटे सहरी करुन रोजा (उपवास) धरतात व सांयकाळी सूर्यास्ता नंतर सर्व बांधव मस्जिद मध्ये एकत्र येवून खजुराचे सेवन करुन रोजा इफ्तार करतात. पहाटे फजरच्या नमजाने या शब - ए - कद्र  या विशेष रात्रची सांगता होते. सलग 30 दिवस रोजे (उपवास) ठेवल्या नंतर चंद्र पाहून रमजान ईद साजरी करण्याचा निर्णय घेतला जातो. रमजान मासारंभानिमित्त शहरात पवित्र वातावरण असून घरोघरी पवित्र वातावरण आहे.