Sun, Apr 21, 2019 05:49होमपेज › Pune › भावाने बांधली बहिणीला राखी

भावाने बांधली बहिणीला राखी

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 27 2018 12:21AMपुणे : प्रतिनिधी

धनकवडी येथे पुरुषांनी महिलांना राख्या बांधून अनोख्या पद्धतीने राखी पौर्णिमा साजरी केली. बहिणीने भावाच्या पाठीशी कायम उभे राहून मदतीचा हात द्यावा, अशी इच्छाही व्यक्त केली. 

धनकवडी येथील एकता योगा ट्रस्टतर्फे अभिजित कदम क्रीडा संकुलाच्या सभागृहात रक्षाबंधनाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. एकता योगा ट्रस्ट व ज्येष्ठ नागरिक संघ दक्षिण पुणेचे अध्यक्ष नाना निवंगुणे यांनी हा अनोखा उपक्रम आयोजित केला होता. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस माणिक चव्हाण, सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक शांताराम कुंजीर, शिरीष मोहिते, उदय जगताप, नगरसेवक युवराज बेलदरे, नमनशेठ बाबर, अनिल तागडे, डॉ. रंजना पवार-कदम उपस्थित होते. या उपक्रमामध्ये 200 हून अधिक बहीण- भाऊ सहभागी झाले होते.