Tue, Jun 25, 2019 21:21होमपेज › Pune › ‘वाल्मी’ सहसंचालकाच्या घरांची झडती

‘वाल्मी’ सहसंचालकाच्या घरांची झडती

Published On: Dec 30 2017 1:30AM | Last Updated: Dec 30 2017 12:00AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई न करता त्यांची शैक्षणिक कागदपत्रे परत देण्यासाठी दहा लाख रुपयांची लाच घेताना औरंगाबादच्या जल व भूमी व्यवस्थापन संस्थेच्या (वाल्मी)  महासंचालक आाणि सहसंचालक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून शुक्रवारी दुपारी रंगेहात पकडले.  यातील अधीक्षक अभियंता तथा सहसंचालक राजेंद्र बाबूराव क्षीरसागरच्या पुण्यातील घरांची पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी झडती घेतली असून त्यात महत्त्वाची कागदपत्रे मिळाली आहेत.  

वाल्मी संस्थेत प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई न करता त्यांची कागदपत्रे परत देण्यासाठी वाल्मीचे महासंचालक हरिभाऊ कांचन गोसावी आणि अधीक्षक अभियंता तथा सहसंचालक राजेंद्र बाबूराव क्षीरसागर(55)यांनी दहा लाखांची लाच मागितली. शुक्रवारी दुपारी सापळा रचून लाचलुपत विभागाने त्यांना एक लाख खर्‍या व 9 लाख डमी नोटा स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले.  त्यानंतर सहसंचालक क्षीरसागर याच्या पुण्यातील नांदेड सीटी व शिवाजीनगर परिसरात घरे आहेत. या घरांची पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी झडती घेतली. या वेळी शिवाजीनगर येथील घराला कुलूप होते. त्यामुळे ते  सील करण्यात आले आहे.  तर नांदेड सिटी येथील घरातून काही कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. तसेच रात्री उशिरापर्यंत त्यांच्या घराची झडती सुरू होती.