Tue, Jul 16, 2019 01:36होमपेज › Pune › दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज

दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज

Published On: Apr 15 2018 1:27AM | Last Updated: Apr 15 2018 1:27AMपुणे : प्रतिनिधी

दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकणात आज (रविवार, दि. 15) दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्र ते मराठवाडादरम्यान द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे पाऊस पडेल, असेही सांगण्यात आले. यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील दोन-तीन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, तुरळक ठिकाणी पावसाचे संकेत असल्याचेही नमूद करण्यात आले. दरम्यान, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी शनिवारी दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली.

कोकण, गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत शनिवारी किंचित वाढ, तर विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये नोंदविले गेलेले तापमान असे- पुणे 38.6, मुंबई 32.7, कोल्हापूर 36.9, नगर 40.6, नाशिक 38.1, सांगली 38, सातारा 37.6, सोलापूर 39.5, औरंगाबाद 38, नागपूर 38.5 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले.

Tags : Pune, Pimpri, Rainfall, forecast,  south, central, Maharashtra, today