Sat, Nov 17, 2018 23:22होमपेज › Pune › दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकणात आज पाऊस

दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकणात आज पाऊस

Published On: May 17 2018 1:25AM | Last Updated: May 16 2018 8:17PMपुणे : प्रतिनिधी

राज्याच्या तुरळक भागात गुरुवारी (दि. 17) पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावणार असून, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात दुपारनंतर वादळी वार्‍यांसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या अंदाजामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. मराठवाड्यात येत्या 24 तासांत उष्णतेची लाट येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या विदर्भात सूर्य अक्षरशः आग ओकत असून, तेथे उष्णतेची लाट गेल्या पंधरवड्यापासून कायम आहे.

विदर्भात बहुतांश शहरांचे कमाल तापमान 42 अंशांच्या पुढे नोंदविले गेले. तर मराठवाड्यात सरासरी 39 अंश, मध्य महाराष्ट्रात सरासरी 38 अंश, कोकण व मुंबईत सरासरी 33 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कोकण, गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात बुधवारी सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडल्याची माहिती देण्यात आली.

Tags : South Central Maharashtra, Konkan, Rain, today,