Wed, Sep 19, 2018 22:09होमपेज › Pune › मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार

मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 17 2018 1:07AMपुणे : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी शुक्रवार (दि. 17) मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उत्तर कोकण, पश्‍चिम विदर्भात सोसाट्याच्या वार्‍यासह अतिवृष्टी होईल, अशी शक्यताही वर्तविली गेली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सध्या कार्यरत आहे.  दक्षिण छत्तीसगड व पश्‍चिम विदर्भात चक्राकार वार्‍यांची स्थिती निर्माण झाली आहे. येत्या 24 तासांत त्याचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होणार आहे.  मध्य महाराष्ट्र, विदर्भातील पावसाचे प्रमाण वाढेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.