Thu, Apr 25, 2019 04:14होमपेज › Pune › आंदोलनकर्ते पुणे स्थानकावर, रेल्वे मात्र वेळापत्रकानुसारच धावल्या 

आंदोलनकर्ते पुणे स्थानकावर, रेल्वे मात्र वेळापत्रकानुसारच धावल्या 

Published On: Jan 03 2018 6:56PM | Last Updated: Jan 03 2018 6:56PM

बुकमार्क करा
पुणे: प्रतिनिधी 

भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर आंदोलनकर्त्यांनी पुणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आरपीएफ व जीआरपीचे जवान पुढे सरसावले. त्यांनी आंदोलनकर्त्यांना रोखत रुळावर उतरून दिले नाही. यामुळे पुणे स्थानकावरून सुटणारी एकही रेल्वे उशिराने सुटली नसून सर्व रेल्वे नियोजित वेळेतच सोडण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. एकही रेल्वे रद्द करण्यात आली नाही, असेही सांगण्यात आले. 

दरम्यान, मुंबईत रुळांवर उतरत काही लोकल रोखून धरल्याच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यातही त्याचे पडसाद उमटतील, अशी चिन्हे दिसत होती. मात्र, पुणे विभागात एकही रेल्वे रोखली गेली नाही, असे रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले. यामुळे महाराष्ट्र बंदच्या दिवशी एसटी सेवेचे जरी तीन-तेरा वाजले असले तरीदेखील रेल्वे सेवा मात्र सुरळीत सुरू असल्याचे पाहायला मिळाले. परंतु, पुणे रेल्वे स्थानकासह शिवाजीनगर, पिंपरी, खडकी, आदी स्थानकांवर प्रवाशांची वर्दळ बुधवारी तुलनेने कमीच पाहायला मिळाली. दंगल उसळेल व रेल्वे रोखण्यात येईल या भीतीने आम्ही प्रवास करायचे टाळले, असे काही प्रवाशांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.