Tue, May 21, 2019 22:09होमपेज › Pune › रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेल सुरक्षा अ‍ॅप’ 

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेल सुरक्षा अ‍ॅप’ 

Published On: Jan 24 2018 4:10PM | Last Updated: Jan 25 2018 2:57PMपुणे : प्रतिनिधी 

रेल्वे प्रवाशांच्या अडचणी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा ॲपचे उद्घाटन आज (बुधवार २४ जानेवारी) करण्यात आले. आरपीएफच्या पुणे विभागातर्फे हे ॲप तयार करण्यात आले आहे. या रेल्वे अ‍ॅपचे उद्घाटन महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्या हस्ते सांगली येथे करण्यात आले.

रेल्वे प्रवाशांना प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या जवळील पोलिस स्टेशन, हॉस्पिटलचे फोन क्रमांक तसेच रेल्वे स्टेशनवरील अधिकार्‍यांची नावे व फोन क्रमांक मिळविणे या अ‍ॅपमुळे सहज शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे रेल्वे प्रवासादरम्यान घडणार्‍या गुन्ह्यांच्या व घटनांच्या तक्रारी देखील रेल्वे अ‍ॅपमध्ये नोंदविता येणार आहेत. रेल्वे सुरक्षा अ‍ॅप अँड्रॉइड फोन धारकांसाठी गुगल प्ले स्टोअर व आयफोन धारकांसाठी अ‍ॅप स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली.