Tue, Jul 16, 2019 12:24होमपेज › Pune › ‘आरटीई’चा परतावा शाळांच्या खात्यामध्ये वर्ग 

‘आरटीई’चा परतावा शाळांच्या खात्यामध्ये वर्ग 

Published On: Apr 14 2018 1:41AM | Last Updated: Apr 14 2018 12:41AMपिंपरी : वर्षा कांबळे 

मोफत शिक्षण हक्क (आरटीई) कायद्याअंतर्गत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे गेल्या पाच वर्षांपासूनचा परतावा शासनाकडे थकला आहे. याबाबत  पिंपरी -चिंचवड शहरातील इंडिपेन्डंट इंग्लिश स्कूल असोसिएशन संघटनेने औरंगाबाद येथील खंडपीठात धाव घेतली आहे. जोपर्यंत खंडपीठाचा निर्णय येत नाही तोपर्यंत संघटनेच्या खासगी शाळांनी प्रवेशप्रक्रिया बंद ठेवली आहे. सध्या शासनाकडून आरटीईच्या 2015 - 16 या वर्षातील परताव्याची रक्कम शासनाने शाळांच्या खात्यात वर्ग केली आहे. मात्र, परताव्याची दहा टक्केच रक्कम शाळांनी मिळाली असल्यामुळे आरटीई प्रवेश देण्यास शाळांनी नकार दिला आहे. 

शैक्षणिक वर्ष 2018-19 या कालावधीसाठी आरटीई बालांकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्काची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याकरिता शासन निर्णय, अधिसूचना व कार्यपद्धती जाहीर केली.  मात्र, 25 टक्के नियमाच्या आदेशाला शाळा, समिती व स्थानिक प्रशासन हरताळ फासताना दिसत आहे. परताव्या अभावी कोर्टात गेलेल्या शाळांनी प्रवेश रखडविले आहेत. त्यांच्यावर कारवाई करताना प्रशासन कमी पडताना दिसत आहे. ज्या शाळा प्रवेश नाकारतील त्यांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तरीदेखील विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारणे शाळांकडून सुरुच आहे. शाळांकडून प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचा शासनाकडून शुल्क परतावा मिळत नसल्याने शाळा प्रशासनाने पालकांची जाणून बुजून अडवणूक करणे. विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारणे, पैसे मागणे, इत्यंभूत माहिती न देणे व उडवा उडवीचे उत्तरे देणे, पालकांचा मानसिक छळ करुन त्यांना अपमानित करणे असे प्रकार सुरु असतात. त्यामुळे पालकही भितीच्या वातावरणाखाली आहेत. पिंपरी -चिंचवड शहरातील 175 शाळा आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यामध्ये काही शाळांनी परताव्यासाठी प्रवेश थांबविले आहेत. तर ज्या शाळा प्रवेश देत आहेत. त्या पालकांकडून पैशाची मागणी करत आहेत. या सर्व प्रकारांनी पालक मेटाकुटीस आले आहेत. याबाबत शिक्षण उपसंचालक शरद गोसावी व शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. 

दोन वर्षाच्या परतावा म्हणजे फक्त दहा टक्केच रक्कम खात्यात जमा केली आहे. 2015 - 16 या शैक्षणिक वर्षामध्येे जेवढे प्रवेश झाले. ज्या शाळांमध्ये पाच ते सात मुले होती त्यांना पूर्ण दिले आहेत. तर ज्या शाळांमध्ये पंधरा ते सोळा मुले होती त्यांना दहा टक्केच रक्कम दिली गेली आहे.    जागृती धर्माधिकारी (अध्यक्ष, इंडिपेन्डंट इंग्लिश स्कूल असोसिएशन)

शिक्षणाधिकारी शैलजा धराडे यांनी आम्हाला दोन दिवसांपर्वूीच  2015 - 16 चा परतावा शिक्षण संस्थांच्या खात्यात वर्ग केला आहे, असे सांगितले आहे. शाळांनी देखील आपली मानसिकता बदलून प्रवेश प्रक्रियेला विलंब करुन नये. न्यायालयीन प्रक्रियेचे नाव पुढे करुन टाळाटाळ केली जात आहे हे गैर आहे.     हेमंत मोरे (अध्यक्ष, आरटीई पालक संघ) 
 

Tags : pune, pune news, schools, RTE returns,