होमपेज › Pune › ‘कॉल ऑफ द डे’ एकांकिकेने उद्या उघडणार ‘पुरुषोत्तम’चा पडदा

‘कॉल ऑफ द डे’ एकांकिकेने उद्या उघडणार ‘पुरुषोत्तम’चा पडदा

Published On: Aug 12 2018 4:29PM | Last Updated: Aug 12 2018 4:29PMपुणे : प्रतिनिधी

पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेची प्राथमिक फेरी उद्या (दि. १३)पासून भरत नाट्य संशोधन मंदिर येथे सुरू होत आहे. १३ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट पर्यंत या प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. रोज सायंकाळी ५ ते ८ आणि प्रत्येक रविवारी सकाळी ९ ते १२, सायंकाळी ५ ते ८ या सत्रात होणार आहे. उद्या (दि. १३) रोजी सायंकाळी पाच वाजता पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे ‘कॉल ऑफ द डे’ या एकांकिकेने पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचा पडदा उघडणार आहे.

त्यानंतर, सायंकाळी ६ वाजता निगडी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे ‘झुरळाख्यान’ आणि ७ वाजता टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयातर्फे ‘विक्टिम’ या एकांकिका सादर होतील. स्पर्धेची अंतिम फेरी १ व २ सप्टेंबर रोजी होणार असून दरवर्षी प्रमाणे स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी त्या-त्या फेरीचे निकाल जाहीर होतील. ७ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडेल.