Thu, Apr 25, 2019 04:04होमपेज › Pune › पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा

आज 51 संघ होणार जाहीर

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 15 2018 1:24AMपुणे : 

महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या प्रवेशिका घेण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधींनी गर्दी केली होती. शनिवारपासून (दि. 14) प्रवेशिका मिळण्यास सुरुवात झाली.  आज (दि. 15) सायंकाळी 6 ते 8 या वेळेत स्पर्धेच्या प्रवेशिका मिळणार आहेत. स्पर्धेची प्राथमिक फेरी 13 ऑगस्ट ते 28 ऑगस्टपर्यंत भरत नाट्यमंदिर येथे आयोजित केली  गेली आहे.

शुक्रवार पेठेतील सुभाष नगरमधील विवेक अपार्टमेंट येथे स्पर्धेच्या प्रवेशिका वाटप करण्यात येत आहेत. मागील वर्षी 51 संघांपैकी तळात असणारे दहा संघ आणि यावर्षी नव्याने स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या संघामधून आज (दि. 15) चिठ्ठ्यांद्वारे दहा संघ निवडले  जातील. या नव्या 51 संघांचे प्रवेश अर्ज  दि.3  आणि 4 ऑगस्ट रोजी  स्वीकारले जातील.