Sun, Nov 18, 2018 03:15होमपेज › Pune › ‘पुरुषोत्तम’चा पडदा उघडणार 13 ऑगस्टला

‘पुरुषोत्तम’चा पडदा उघडणार 13 ऑगस्टला

Published On: Jul 13 2018 12:50AM | Last Updated: Jul 12 2018 10:20PMपुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्रीय कलोपासकच्यावतीने आयोजीत करण्यात येणार्‍या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून, 13 ऑगस्ट ते 28 ऑगस्टपर्यंत प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या प्रवेशिका 14 जुलै व रविवार दिनांक 15 जुलै रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत मिळणार आहेत.

त्यासाठी, महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रतिनिधीने महाविद्यालयाच्या लेटरहेडवर प्रवेश अर्जाची मागणी करायची आहे. मागील वर्षी 51 संघांपैकी तळात असणारे दहा संघ आणि यावर्षी नव्याने स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या संघामधून रविवारी (दि. 15) सायंकाळी चिठ्यांद्वारे दहा संघ निवडले जातील. या नव्या 51 संघांचे प्रवेश अर्ज शुक्रवार, दिनांक 3 ऑगस्ट आणि शनिवार, दिनांक 4 ऑगस्ट रोजी स्वीकारले जातील. शुक्रवार पेठेतील सुभाष नगरमधील विवेक अपार्टमेंट येथे स्पर्धेच्या प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत.

1 व 2 सप्टेंबर रोजी स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. या स्पर्धेचा निकाल 2 सप्टेंबर रोजी जाहिर होणार असून, 7 सप्टेंबर रोजी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे.