Mon, Feb 18, 2019 20:42होमपेज › Pune › पत्नी, मुलींचा खून करून पुण्यात व्यावसायिकाची आत्महत्या

पत्नी, मुलींचा खून करून पुण्यात व्यावसायिकाची आत्महत्या

Published On: Feb 17 2018 10:23AM | Last Updated: Feb 17 2018 10:23AMपुणे : प्रतिनिधी 

शिवणे येथे एका व्यावसायिकाने पत्नी व दोन मुलींची हत्या करत स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. त्याचा खिशात सूसाईड नोट सापडली असून कर्जबाजारीपणामुळे हे कृत्य करीत असल्याचे त्यात म्हटले आहे. 

नीलेश सुरेश चौधरी असे आत्महत्या करणार्‍या व्यावसायिकाचे नाव आहे. त्याने काल रात्री आपल्या ७ व १२ वर्षाच्या मुली व पत्नीचा खून करत स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजाऱ्यांना कुणीही दार उघडत नसल्याने संशय आल्यानंतर त्यांनी उत्तरनगर पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर उत्तमनगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवून दिले. तर नीलेश चौधरी याच्या खिशात सुसाईड नोट मिळून आली असून कर्जबाजारी पणामुळे आपण हे कृत्य करत असल्याचे त्यात म्हटले आहे.