होमपेज › Pune › पुणे : शिवसृष्टीच्या मागणीसाठी मुस्लिम संघटनेचा महापालिकेवर मोर्चा

पुणे : शिवसृष्टीच्या मागणीसाठी मुस्लिम संघटनेचा महापालिकेवर मोर्चा

Published On: Jan 30 2018 3:50PM | Last Updated: Jan 30 2018 3:50PMपुणे प्रतिनिधी : प्रतिनिधी

पुणे शहरातील  कोथरूड येथील जागेवर शिवसृष्टी व्हावी या मागणीसाठी मुस्लिम संघटनेने पुणे महापालिकेवर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये विविध संघटनेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

कोथरूड येथील शिवसृष्टी प्रकल्प अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.त्यावर कोणताही निर्णय महापालिकेने घेतलेला नाही. याचा निषेध म्हणून घोषणाबाजी करण्यात आली.

 या मोर्चात सहभागी झालेले नगरसेवक गफूर पठाण म्हणाले की,मागील कित्येक वर्षांपासून शिवसृष्टी बाबत केवळ चर्चा चालू आहे. मात्र कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे मोर्चा काढण्यात आला आहे. ही निषेधार्थ बाब असून, आमच्या मागणीची सताधारी पक्ष आणि प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र लढा उभारला जाईल. असा इशारा त्यांनी दिला.