Thu, Jan 24, 2019 18:51होमपेज › Pune › पुण्यातील टेकड्या फक्त कागदोपत्री सुरक्षित : खासदार चव्हाण

पुण्यातील टेकड्या फक्त कागदोपत्री सुरक्षित : खासदार चव्हाण

Published On: Jun 05 2018 3:15PM | Last Updated: Jun 05 2018 3:15PMपुणे : प्रतिनिधी

शहरालगतच्या बहुसंख्य टेकड्या या आजही फक्त कागदोपत्रीच सुरक्षित आहेत. प्रत्यक्षात त्यांवर होत असलेल्या अनधिकृत बांधकामांमुळे त्या धोकादायक स्थितीत आहेत, अशी खंत खासदार वंदना चव्हाण यांनी व्यक्त केली. घोले रस्ता येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित चार दिवसीय जैवविविधता महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी चव्‍हाण बोलत होत्या. 

कार्यक्रमादरम्यान, देवराई या विषयावरील चित्रफीत तसेच 'लेटस् गो प्लास्टिक वेस्ट फ्री' या पुस्तिकाचे अनावरण करण्यात आले. तसेच, प्लास्टिक प्रदुषण या थीमवर आधारीत छायाचित्र स्पर्धेत स्वरूप गोखले यांना प्रथम तर प्रशांत खरोटे यांना द्वितीय तसेच दख्खन पठारावरील जैवविविधता या विषयावर आधारीत छायाचित्र स्पर्धेत हिरा पंजाबी यांना प्रथम, प्रशांत पाटील यांना द्वितीय तर शिवांद हिरेमठ यांना तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले. निसर्ग छायाचित्र प्रदर्शनासाठी देशभरातून सुमारे ६५ छायाचित्रकारांनी सहभाग नोंदविला असून त्यांमार्फत काढण्यात आलेली २५० छायाचित्रे प्रदर्शनात पाहता येणार आहे.