Mon, Sep 24, 2018 21:39होमपेज › Pune › जुगार अड्ड्यावरील छाप्यात पोलिस निरीक्षक अटकेत

जुगार अड्ड्यावरील छाप्यात पोलिस निरीक्षक अटकेत

Published On: Dec 10 2017 1:21AM | Last Updated: Dec 10 2017 1:02AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

पुण्यात जुगार अड्ड्यावर विशेष पथकाने टाकलेल्या छाप्यात पुणे ग्रामीण पोलिस दलातील वरिष्ठ निरीक्षक विजय शामराव जाधव (55, रा. मुक्तानंद सोसायटी, फातिमानगर) याला रंगेहात पकडण्यात आले. मुंढवा परिसरात शुक्रवारी मध्यरात्री परिमंडळ दोनचे उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे व त्यांच्या पथकाने छापा टाकला. 

या छाप्यात 7 लाखांच्या रोकडसह सव्वा कोटी रुपयांचा माल जप्त केला आहे. त्यामध्ये 12 चारचाकींचा समावेश आहे. जाधव यांच्यासह तेथे जुगार खेळणार्‍या 41 जणांना अटक झाली आहे. जुगार अड्डा चालविणारा माजी नगरसेवक अविनाश कृष्णाजी जाधव (रा. घोरपडे पेठ) याच्यासह चार संचालकांवर मुंढवा पोलिसात गुन्हा दाखल असून, पोलिस नाईक ज्ञानेश्‍वर पालवे यांनी फिर्याद दिली.