Tue, Apr 23, 2019 13:36होमपेज › Pune › पुण्यातील 'त्‍या'हवालदाराची उचलबांगडी (व्‍हिडिओ)

पुण्यातील 'त्‍या'हवालदाराची उचलबांगडी (व्‍हिडिओ)

Published On: Feb 05 2018 6:57PM | Last Updated: Feb 05 2018 6:57PMवाकड : वार्ताहर 

टेम्पो चालकाला भर रस्त्यात चोप देणाऱ्या  वाहतूक शाखेच्या पोलिस हवालदाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर त्या हवालदाराची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अशोक मोराळे यांनी पुढारीशी बोलताना ही माहिती दिली. 

वाकड येथील भूमकर चौकात शनिवार (दि.३) सायंकाळी ५ वाजता हा प्रकार घडला होता. त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या एका पादचाऱ्याने मोबाईल कॅमेर्‍यामध्ये हा प्रकार कैद करीत सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता.

पुण्यात वाहतूक पोलिसाकडून टेम्‍पो चालकाची 'धुलाई'(Video)

या व्हिडीओमध्ये हिंजवडी वाहतूक विभागात कार्यरत असलेले हवालदार डी. एस. ढावरे एका चालकास बेदम मारहाण करीत असल्याचे स्पष्ट दिसत होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर चौफेर टीकेची झोड उठली. याची गंभीर दखल घेत उपायुक्त मोराळे यांनी त्या हवालदारास मुख्यालयाशी संलग्न केले. याबाबत पुढारीशी बोलताना ते म्हणाले की,वाहतूक विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी वाहनचालकांशी सौजन्य दाखवावे. नियम न पाळणाऱ्या चालकांविरोधात कायदेशीर कारवाई करावी परंतू अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी आक्रमक भूमिका घेऊ नये.