Fri, Jul 19, 2019 07:29होमपेज › Pune › स्वच्छ शहरांच्या यादीत पुणे देशामध्ये दहावे

स्वच्छ शहरांच्या यादीत पुणे देशामध्ये दहावे

Published On: Jun 24 2018 1:34AM | Last Updated: Jun 24 2018 1:11AMपुणे : प्रतिनिधी

स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेतलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुणे शहर देशात 10व्या क्रमांकावर असून, इंदौर आणि भोपाळने अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहर 43 क्रमांकावर फेकले गेले, तर नवी मुंबईने 9 वा क्रमांक मिळविला आहे.  

देशातील साडेचार हजार शहरे स्पर्धेत सहभागी झाली होती. त्यात लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश होता. तर देशातील 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गटात पुण्याचा सहभाग होता. हे सर्वेक्षण जानेवारी 2018 मध्ये झाले होते. त्यात 40 निकषांवर हे सर्वेक्षण घेण्यात आले. त्याचे रँकिंग केंद्राने जाहीर केले असून, पहिल्या दहा शहरांमध्ये नवी मुंबई महापालिका आणि पुणे शहराचा क्रमांक लागला आहे. 

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी ही माहिती दिली देशातील स्वच्छ शहर म्हणून पुणे शहर पहिल्या पाचमध्ये असावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका प्रशासन, तसेच भाजप पदाधिकार्‍यांना व्यक्तिगत लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, अनेक निकषांमध्ये महापालिकेस अपेक्षित काम करता न आल्याने पालिकेस दहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. मागील वर्षी पुण्याला मागे टाकत 9 वा क्रमांक पटकाविणारी पिंपरी-चिंचवड महापालिका यावर्षी थेट 43 व्या क्रमांकावर फेकली गेली आहे.