Mon, Jan 21, 2019 00:36होमपेज › Pune › पतंग उडवताना इमारतीवरून पडून मुलाचा मृत्यू

पतंग उडवताना इमारतीवरून पडून मुलाचा मृत्यू

Published On: Jan 28 2018 3:45PM | Last Updated: Jan 28 2018 3:45PMपुणे : प्रतिनिधी

पतंग उडवताना तोल गेल्‍याने चौथ्‍या मजल्‍यावरून पडून अतिक चांद शेख (वय ११)  या मुलाचा दुदैवी मृत्‍यू झाला. ही घटना कोढवा परिसरात घडली.

अतिक हा कोंढाव्यातील व्ही. आय. टी कॉलेजच्या पाठीमागे राहत होता. तो आज सकाळी परिसरात असणाऱ्या एका पडीक इमारतीवरील चौथ्या मजल्यावर पतंग उडवण्यासाठी गेला. मात्र तो पतंग उडवत असताना तोलजाऊंन तो खाली कोसळा. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी कोंढवा पोलिस अधिक तपास करत आहेत.