Thu, Aug 22, 2019 10:12होमपेज › Pune › पुणे ‘महामेट्रो’ला वाटाण्याच्या अक्षता

पुणे ‘महामेट्रो’ला वाटाण्याच्या अक्षता

Published On: Mar 11 2018 1:02AM | Last Updated: Mar 11 2018 1:02AMपुणे : प्रतिनिधी 

पुण्याच्या मेट्रो प्रकल्पाने जोर धरलेला असताना राज्य शासनाने निधी वाटपात केलेल्या कंजुषीने या प्रकल्पाच्या प्रगतीला बाधा येण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत पुणे मेट्रोचे काम वाढणार असल्यामुळे निधीची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी पुणे महामेट्रोने शासनाकडे 850 कोटींची मागणी केली होती; मात्र शासनाने फक्त 130 कोटींचा निधी मंजूर करून पुणे मेट्रोला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. याउलट नागपूर मेट्रोला पुण्याच्या मेट्रोएवढीच मागणी केली असताना नागपूरला मात्र भरघोस 310 कोटींचा भरघोस निधी मंजूर केला आहे. 

शासनाने मंजूर केलेल्या 130 कोटीच्या निधीपैकी  100 कोटी समभागापोटी; तर 30 कोटी कर्ज उभारण्यासाठी दिलेले आहेत. म्हणजेच, महामेट्रोने मागणी केलेल्या रकमेच्या अवघी 15.30 टक्के रक्कम पुण्यासाठी देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे;  तर नागपूर मेट्रोला मागणीच्या 36.50 टक्के रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. शासनाने केलेल्या या भेदभावाचा  पुणेकरांच्या मेट्रो स्वप्नावर परिणाम करणारा का, हे येत्या काळात दिसून येणार आहे.

मेट्रो प्रकल्पासाठी महामेट्रोने शासनाकडे पुणे आणि नागपूरसाठी प्रत्येकी 850 कोटींच्या निधीची मागणी केली होती. पैकी पुण्याला 130 कोटी; तर नागपूरला 310 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. यावरून नागपूरला शासनाने सढळ हाताने मदत केल्याचे दिसून येत असून, पुण्याच्या तोंडाला पाने पुसली असल्याची भावना व्यक्त होत आहे.