Wed, Nov 14, 2018 02:13होमपेज › Pune › पुण्यात दहा लाखांचा गांजा पकडला

पुण्यात दहा लाखांचा गांजा पकडला

Published On: May 01 2018 2:45PM | Last Updated: May 01 2018 2:45PMपुणे : प्रतिनिधी

रात्रीच्या गस्तवरील पुणे ग्रामीण पोलिसांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या संशयास्पद वाहनांची तपासणी केली असता तब्बल २०० किलो वजनाचा आणि १० लाख रुपये किंमतीचा गांजा आढळून आला. हा गांजा पंचासमोर जप्त करण्यात आला असून दहा लाख रुपये किंमतीची गाडीही जप्त करण्यात आली आहे. 

शिरगाव येथील गहुंजे गावाकडे जाणार्‍या रस्त्याने पोलिस उपनिरीक्षक नितीन मोहिते आणि इतर कर्मचारी रात्री साडेतीनच्या सुमारास गस्त घालत असताना रस्त्याच्या कडेला संशयास्पद वाहन आढळून आले. शासकीय वाहन येत असल्याचे पाहून दोन इसम गाडी तेथेच सोडून पसार झाले. गाडीची पाहणी केली असता  गाडीच्या मागील सीटवर तब्बल २०० किलोचा गांजाचे पॅकेट असलेली कॅरीबॅग आढळून आली. याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक मुगुट पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरीष दिघावकर यांना देण्यात आली. या गुन्ह्यातील गाडी आणि २०० किलो गांजा हा पंचासमोर जप्त करण्यात आला. पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक सुवेज हक, अप्पर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणपतराव माडगुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नितीन मोहिते, कर्मचारी बंडु मारणे, नितीन गार्डी, आतिष जाधव, संतोष मोरे, रामदास बहिरट, महेंद्र रावते, श्रीकांत गायकवाड, अजित काळे आदि कर्मचार्‍यांनी ही कामगिरी पार पाडली.