Thu, Jul 18, 2019 12:24होमपेज › Pune › हिमाचलला नमवून महाराष्ट्राची विजयी सलामी

हिमाचलला नमवून महाराष्ट्राची विजयी सलामी

Published On: Jan 14 2018 1:54AM | Last Updated: Jan 14 2018 12:38AM

बुकमार्क करा
पुणे प्रतिनिधी

बाराव्या राष्ट्रीय फ्लोरबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने हिमाचल प्रदेशवर 4-1 ने मात करून विजयी सलामी दिली.  म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत सलामीच्या लढतीत महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशचे आव्हान सहज परतवून लावले. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी भारतीय फ्लोरबॉल फेडरेशनचे उपाध्यक्ष हरिंदर कुमार, सरचिटणीस डॉ. प्रदीप सिंग, महाराष्ट्र फ्लोरबॉल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जगन्नाथ शिंदे, सचिव रविंद्र चोथवे उपस्थित होते.  हिमाचल प्रदेशकडून अभिषेकने 5 व्या मिनिटाला गोल करून आक्रमक सुरुवात केली. मात्र यानंतर हिमाचल प्रदेशच्या खेळाडूंना वर्चस्व राखण्याची संधी महाराष्ट्रच्या खेळाडूंनी दिली नाही.

महाराष्ट्रकडून नीलेश पाटीलने (18 आणि 19 मि.) 2 गोल, तर भावेश वाणी (22 मि.) आणि यशवंत सिंग पाटीलने (20 मि.) प्रत्येकी एक गोल केला. दुसर्‍या लढतीत उत्तराखंड संघाने उत्तरप्रदेश संघावर 4-1 ने मात केली. यात उत्तराखंड संघाकडून राहुलने सहाव्या मिनिटाला पहिला गोल केला. यानंतर विनीतने दुसरा गोल करून उत्तराखंडला 2-0  अशी आघाडी मिळवून दिली. पुढच्याच मिनिटाला पार्थ अरोराने गोल करून उत्तरप्रदेश संघाची पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर मात्र उत्तराखंडच्या खेळाडूंनी उत्तरप्रदेशच्या खेळाडूंना संधी दिली नाही. उत्तराखंडकडून 22 व्या मिनिटाला गोविंदने आणि 23 व्या मिनिटाला रोहितने गोल केला.  मध्यप्रदेश संघाने तेलंगणाचा 13-0 ने धुव्वा उडविला.

यात यश पौडवालने (6 मि, 13 मि., 15मि., 19 मि.,20 मि.) असे 5  गोल केले.  अक्षय दलालने (2 मि.,4 मि.,7 मि, ) 3 गोल केले. आणि सागर दरोळ (14 मि., 16 मि. 17 मि.) याने 3 गोल केले.  हरेंद्र,आदित्य  यादव याने प्रत्येकी 1 गोल केला. तिसर्‍या लढतीत तामिळनाडूने गोव्यावर 6-0 ने विजय मिळविला. यात नवीनने हॅटट्रीक केली. त्याने दुसर्‍या, चौथ्या आणि सातव्या मिनिटाला गोल केले. त्याला प्रतिक कुमारने   2 गोल करून तर नरेश कुमारने 1 गोल करून चांगली साथ दिली.