Mon, Aug 19, 2019 07:36होमपेज › Pune › ‘इव्हेंट’ कंपन्यांची डिसेंबरमध्ये तब्बल १०० कोटींची उलाढाल

‘इव्हेंट’ कंपन्यांची डिसेंबरमध्ये तब्बल १०० कोटींची उलाढाल

Published On: Dec 06 2017 1:42AM | Last Updated: Dec 06 2017 1:25AM

बुकमार्क करा

पुणे : दिगंबर दराडे

वर्षाच्या शेवटी डिसेंबरमध्ये इव्हेंट कंपन्यांकडून तब्बल शंभर कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहे. या करापोटी 28 कोटी रुपये या कंपन्यांकडून वस्तू-सेवा कर (जीएसटी) मिळणे अपेक्षित आहे.

‘थर्टीफस्ट’चे काउंटडाउन सुरू झाले आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी सायबर सिटीतील हॉटेल्स, बीअर बार आणि रेस्टॉरंट आकर्षक रोषणाईसह सज्ज झाले आहेत. अधिकाधिक ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी खाद्यपदार्थ आणि मद्यांवर विविध सवलती देण्याच्या जाहिराती सोशल मीडियावर फिरू लागल्या आहेत. 

शहरातील मोठमोठी हॉटेलची आतापासूनच या कंपन्यांनी बुकिंंग करणे सुरू केले आहेत. सर्व हॉटेल्स व बीअर बारमधून थर्टीफर्स्टच्या पार्श्‍वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. काही तारांकित हॉटेल्समध्ये अनलिमिटेड फूड, ड्रिंक त्याचबरोबर डीजे आदी ऑफर देण्यात येत आहेत. फॅमिली व लहान मुलांसाठी विशेष पॅकेज ठेवण्यात आले असून, यासाठी सोशल साईट्सच्या माध्यमातून जाहिराती करण्यात येत आहेत. दि. 1 जुलैपासून जीएसटी सुुरू झाल्यामुळे याचा परिणाम डिसेंबरमध्ये पाहायला मिळणार का, असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत.