Fri, Jul 19, 2019 20:25होमपेज › Pune › शिक्षण विभागाविरोधात मनविसेचे घंटानाद आंदोलन

शिक्षण विभागाविरोधात मनविसेचे घंटानाद आंदोलन

Published On: Dec 13 2017 4:49PM | Last Updated: Dec 13 2017 4:49PM

बुकमार्क करा

पुणेः प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज (बुधवार) शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारा विरोधात शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले.

शासनाने पुणे शहरातील बंद केलेल्या ७६ मराठी शाळा, फी वाढ करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यास शासनाची असमर्थता , शुल्क नियंत्रण कायदा तयार न करणे, पुर्व प्राथमिक शिक्षणाबाबत कायदा तयार न करणे अशा विविध विषयांमधील शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ बंद करून यासंदर्भात तत्काळ निर्णय न झाल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मानविसे चे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी दिला आहे. यासंदर्भातील निवेदन शिक्षण आयुक्त डॉ विपीन शर्मा यांना देण्यात आले. यावर त्यांनी तुमच्या मागण्या तत्काळ शासनाकडे पाठवणार असल्याचे सांगितले आहे.