Thu, Sep 20, 2018 14:09होमपेज › Pune › पुणे न्यायालयातील लिपीक 300 रूपयांची लाच घेताना जाळ्यात

पुणे न्यायालयातील लिपीक 300 रूपयांची लाच घेताना जाळ्यात

Published On: Feb 06 2018 3:54PM | Last Updated: Feb 06 2018 3:54PMपुणे : प्रतिनिधी

शिवाजीनगर न्यायालयातील लिपीकला 300 रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले.शरद रामदास पालवे (26, रा. अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्या लिपीकाचे नाव आहे.

शरद पालवे हे पुणे शिवजीनगर जिल्हा न्यायालयात कनिष्ठ लिपीक म्हणून नोकरीस आहेत. त्यांनी तक्रारदार यांच्या पक्षकारच्या अर्ज प्रकरणात निशाण 1 व आदेश नक्कल विभागात पाठविण्यासाठी मोबदला म्हणून 300 रुपयांची लाच घेतली. त्यावेळी पुणे एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.