होमपेज › Pune › नोटा बदलून घेण्यासाठी आल्यावर खडक पोलिसांची कारवाई

पुणे : नगरसेवकाकडून 2 कोटी 99 लाखाच्या बाद नोटा जप्त 

Published On: Jul 20 2018 12:41PM | Last Updated: Jul 20 2018 12:42PM

पुणे :  प्रतिनिधी
चलनातून बाद करण्यात आलेल्या 2 कोटी 99 लाख रुपयांच्या 1 हजार व 500 व 100 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या संगमनेरच्या नगरसेवकासह पाच जणांना खडक पोलिसांनी रविवार पेठेतून ताब्यात घेतले आहे.  गुरुवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली.

विवार पेठ येथे चलनातून बाद करण्यात आलेल्या नोटांची मोठी रोकड बदलून घेण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती खडक पोलिसांच्या पथकाला गुरुवारी रात्री उशीरा मिळाली. त्यानुसार खडक पोलिसांच्या पथकाने याठिकाणी सापळा लावला. रात्री उशीरा गजेंद्र बाबा अभॆग  व त्यांचे इतर साथीदार असे ट्रॅवल बँगा घेऊन तेथे आले. त्यांची झडती घेतल्यावर बॅगांमध्ये सुमारे 2 कोटी 99 लाख रुपये किंमतीच्या जुन्या नोटा आढळून आल्या. 

त्यानंतर पोलिसांनी त्या नोटा जप्त केल्या असून पाचही जणांना ताब्यात घेतले आहे.  गजेंद्र बाबा अभंग (47, संगमनेर), विजय अभिमन्यू शिंदे (38, खडकी), आदित्य विश्वास चव्हाण (23, मुळशी), सुरेश पांडूरंग जगताप (40, फलटण)  अशी त्यांची नावे आहेत.   त्यांना आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात  आले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली.