Wed, Sep 18, 2019 10:49होमपेज › Pune › पुणे : दहा लाखांसाठी डॉक्टरकडून पत्नीचा छळ

पुणे : दहा लाखांसाठी डॉक्टरकडून पत्नीचा छळ

Published On: Apr 29 2018 2:41AM | Last Updated: Apr 29 2018 2:23AMइंदापूर ः प्रतिनिधी

माहेरवरून प्लॉट घेण्यासाठी दहा लाख रुपये आणले नाहीत, म्हणून एका डॉक्टरने पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. संबंधित डॉक्टर, त्याचे दोन भाऊ व भावांच्या बायका अशा पाच जणांविरुध्द इंदापूर पोलिस ठाण्यात  भा.दं.वि. कलम 498  अन्वये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या बाबतची हकिकत अशी की, येथील एन. के. विश्‍वास यांच्या मुलीचा विवाह गंगाखेड (जि. औरंगाबाद)  येथील डॉ. लिटन तारापदो खेडकर याच्यासोबत 13  मे  2011 रोजी झाला. लग्नात विश्‍वास यांनी जावयाला दोन  लाखांची भांडी व 15 तोळे सोने दिले. लग्नानंतर विश्‍वास  यांची मुलगी सासरी नांदण्यास गेल्यावर डॉ. लिटन याचे पहिले लग्न झाले असल्याचे नवविवाहितेला कळले. त्यामुळे तिने डॉक्टर पती, त्यांचे भाऊ व घरातील इतरांना  विचारले असता त्या सर्वांनी तिला दमदाटी करीत हे कोणालाही न सांगण्याबाबत धमकावले. दरम्यान, डॉ. लिटन याने सासर्‍याकडून वेळोवेळी पैसे घेतले तरीदेखील 3 जुलै 2017  रोजी माहेरवरून प्लॉट  घेण्यासाठी 10 लाख रुपये घेऊन ये असा दम दिला व मारहाण करण्यास तसेच उपाशी ठेवण्यास सुरुवात केली. डॉ. लिटनचे भाऊ तापस विश्‍वास, संजीव विश्‍वास तसेच पतीची भावजय संगीता विश्‍वास, दुसरी भावजय स्मिता  विश्‍वास यांनी छळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सासरकडील या पाच  जणांविरुध्द विवाहितेने फिर्याद  दिली आहे.


 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex