होमपेज › Pune › म्हातोबाचे शेलेकरी परतीच्या मार्गाला (Video)

म्हातोबाचे शेलेकरी परतीच्या मार्गाला (Video)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

वाकड (पुणे) : वार्ताहर 

वाकड हिंजवडीचे ग्रामदैवत म्हातोबा महाराजांच्या उत्सवाचे खास आकर्षण असलेल्या बगाड मिरवणुकीसाठी लागणारे लाकूड आणण्यासाठी गेलेले शेलेकरी परतीच्या मार्गाला लागले आहेत. हिंजवडीपासून दीडशे किलोमीटरवर असलेल्या बारपे येथील जंगलातून शेलेकरी खांद्यावर लाकूड घेऊन निघाले आहेत. 

म्हातोबा महाराजांचा उत्सव येत्या शनिवारी (दि.३१) साजरा होत आहे. बगाड मिरवणूक या उत्सवाची खास ओळख आहे. ही मिरवणूक पाहण्यासाठी जिल्ह्यातून भाविक येतात. या बगाड बांधणीसाठी उंच मजबूत बांधा असेलल्या सरळ लाकडाची गरज असते. म्हातोबाच मूळ ठाण असलेल्या मुळशीतील बारपे येथील जंगलातुनच हे लाकूड आणण्याची पूर्वपार प्रथा आहे. या प्रथे प्रमाणे सोमवारी ( दि. २६) रोजी शेलेकरी पायी प्रवासासाठी रवाना झाले होते. दोन दिवस पायी प्रवास करून शेलेकरी बुधवारी (दि.२८) परतीच्या मार्गाला लागले आहेत. आज गुरुवार ( दि.२९) संध्याकाळी शेलेकरी हिंजवडीत दाखल होणार असल्याचे उत्सव कमिटीच्यावतीने  सांगण्यात आले आहे. 

Tags : Pune, Festival, Wakad, Bagad, 2018, Mhatoba Temple 


  •