Sun, Apr 21, 2019 03:50होमपेज › Pune › पुणे विद्यापीठातील तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू

पुणे विद्यापीठातील तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Published On: May 07 2018 9:53AM | Last Updated: May 07 2018 9:53AMपुणे : प्रतिनिधी

अवघ्या २५ व्या वर्षात तब्बल १५० किलो वजन असणाऱ्या पुणे विद्यापीठातील उच्च शिक्षित विद्यार्थ्याचा सोमवारी सकाळी ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. तो बाथरूला गेल्यानंतर अचानक मोठ्याने ओरडला. इतर मित्रांनी धाव घेऊन त्याला बाहेर काढले. परंतु त्याचा मृत्यू झाला होता. 

ऋषीकेश संजय आहेर (२५, रा. पुणे विद्यापीठ, मूळ.नाशिक) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. आहेर हा पुणे विद्यापीठात एमकॉमच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. तो मुलांच्या वसतीगृहात  राहण्यास होता. दरम्यान आज सकाळी उठल्यानंतर तो बाथरूमला गेला. त्यावेळी अचानक मोठ्याने ओरडला. त्याच्या मित्रांनी धाव घेतली. दरवाजा उघडून त्याला बाहेर काढले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता. हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. अधिक तपास चतुःशृंगी पोलिस करत आहेत.