Tue, Apr 23, 2019 22:34होमपेज › Pune › पुणे :मराठा क्रांती मोर्चाच्या चक्री उपोषणाला सुरुवात

पुणे : मराठा क्रांती मोर्चाच्या चक्री उपोषणाला सुरुवात

Published On: Aug 20 2018 3:22PM | Last Updated: Aug 20 2018 3:21PMपुणे :  प्रतिनिधी

मराठा समाजास आरक्षण मिळावे, आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई, त्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्यावी तसेच आंदोलकांवरील दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे, अशा विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मूक मोर्चा व सकल मराठा समाजातर्फे पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री उपोषणाला सुरुवात झाली आहे. 

या उपोषण स्थळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक शांताराम कुंजीर, रघुनाथ चित्रे पाटील, बाळासाहेब आमराळे यांसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहे. आंदोलनात सहभागी होणार्‍यांसाठी खास आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. या आचारसंहितेनुसारच आंदोलकांनी बेमुदत चक्री उपोषण आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. 

आंदोलकांसाठी आचारसंहिता

चक्री उपोषण आंदोलनात सहभागी होणार्‍यांसाठी आचार संहिता तयार करण्यात आली आहे. आंदोलन शांततेने, संयमाने व शिस्तीने करावे, गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य करू नये. प्रक्षोभक व भडकावू घोषणा-भाषणे करू नये.  आंदोलनादरम्यान झालेला कचरा, रिकाम्या बाटल्या कचरा पेटीत टाकाव्या. अनुचित प्रकार करणार्‍यांना रोखून पोलिसांच्या ताब्यात द्या, अशी वर्तणूक ठेवून कार्यकर्त्यांनी बेमुदत चक्री उपोषणात सहभागी व्हावे, असे आवाहन मोर्चाच्या समन्वयकांनी केले असून तसा फलकही त्याठिकाणी उभारण्यात आला आहे.