Sun, Feb 17, 2019 15:52होमपेज › Pune › मुख्यमंत्री फडणवीस यांची  घोषणा

पुणे :  महापालिकीकडे अनधिकृत बांधकाम शुल्‍काचे अधिकार 

Published On: Jul 23 2018 4:03PM | Last Updated: Jul 23 2018 4:03PMपिंपरी :  प्रतिनिधी

 शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी शुल्क किती आकारायचे याचा पूर्ण अधिकार महापालिकेला देण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.

 पिंपरी चिंचवड महापालिका व  क्रांतिवीर चापेकर  स्मारक समितीतर्फे विकसित करण्यात येणाऱ्या चिंचवड गाव येथील क्रांतिवीर चापेकर  राष्ट्रीय संग्रहालयाच्या इमारतीचे भूमीपूजन मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आयोजित जाहिर कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.

यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आझम पानसरे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, माजी महापौर अपर्णा डोके,  आदी उपस्थित होते.

यावेळी लक्ष्मण जगताप यांनी लोकांना दंड भरता येईल अशा पद्धतीने अनधिकृत बांधकामे नियमित करावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,  शस्तिकर माफी करताना काही त्रुटी राहिल्या आहेत त्या दूर केल्या जातील. बांधकामे नियमितीकरण शुल्क जास्त असल्याचे सांगितले जात आहे शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी शुल्क किती आकारायचे याचा पूर्ण अधिकार महापालिकेला देण्यात येणार असल्याची  घोषणा मुख्यमंत्री  फडणवीस यांनी  केली. तसेच  क्रांतिवीर चापेकर यांच्याविषयी  मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले , पुण्यात प्लेगची साथ आली असताना रँडने जनतेवर जे अत्याचार केले त्या अत्याचारातून चापेकरांनी जनतेची सुटका केली. क्रांतीची ज्योत देशातील तरुणांच्या मना मनात पेटवली. माझ्यासाठी आज भाग्याचा दिवस आहे.  

पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले,  लोकांनी आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ करू. मेट्रो ,  भामा आसखेडमधून पाणी,  पवना बंद नळ योजना मार्गी लावण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरीच पांडुरंगाची पूजा करण्याची भूमिका घेऊन मनाचा मोठेपणा दाखवून दिल्याचा पालकमंत्री बापट यांनी आवर्जून उल्लेख केला