Fri, Sep 20, 2019 04:44



होमपेज › Pune › पुणे : बर्गरमध्‍ये आढळले काचेचे तुकडे

पुणे : बर्गरमध्‍ये आढळले काचेचे तुकडे

Published On: May 21 2019 11:09AM | Last Updated: May 21 2019 11:08AM




पुणे : पुढारी ऑनलाईन

पुण्यातील गोखले रस्त्यावरील 'बर्गर किंग'च्या आउलेटमधील बर्गरमध्ये काचेचे तुकडे आढळल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे.  हा बर्गर खाल्ल्याने एका रिक्षाचालकाला थेट आयसीयूमध्ये दाखल करावे लागले आहे. हा प्रकार १५ मे रोजी घडला आहे. याबाबत डेक्कन पोलिस ठाण्यात बर्गर किंग डेक्कन एरिया मॅनेजर, स्टोअर मॅनेजर आणि सुपरवायझर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुण्यातील गोखले रस्त्यावरील 'बर्गर किंग'मध्‍ये रिक्षाचालक साजित अजमुद्दीन पठाण (वय ३१, रा. वडारवाडी) हे मित्रांबरोबर बर्गर खात होते. यावेळी त्‍यांना  अचानक खोकला आला. यानंतर  त्यांच्या तोंडातून रक्त येऊ लागले. त्‍यांच्‍या मित्रांनी पाहिले असता, बर्गरमध्ये काचेचे तुकडे आढळले. 

काचेचे तुकडे खाल्ल्यामुळे पठाण यांना तोंडात व पोटाच्या अंतर्भागात जखम झाली आहे. मित्रांनी पठाण यांना लगेचच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्‍यात आले. दरम्यान, पठाण यांच्या घरी कोणी नसल्यामुळे त्यांनी उपचार घेतल्यानंतर १९ मे रोजी डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी संबंधित आरोपींवर गुन्हा नोंदविला आहे. 



 





WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex