Thu, Jul 18, 2019 12:17होमपेज › Pune › पुणे :  राजगुरूनगरला जनजीवन सुरळित

पुणे :  राजगुरूनगरला जनजीवन सुरळित

Published On: Jul 31 2018 2:35PM | Last Updated: Jul 31 2018 2:33PMराजगुरूनगर : प्रतिनिधी

पुणे शहरात सोमवारी झालेल्या हिंसक  मराठा क्रांती मोर्चा नंतर  मंगळवारी राजगुरूनगरला तणावपूर्ण शांतता होती. पुणे- नाशिक महामार्गावर वाहनांची संख्या तुलनेने कमी दिसत होती. कालच्‍या आंदोलनाचा परिणाम राजगुरुनगरमधील जनजीवनावर पाहयला मिळत आहे. 

कालच्या मराठा आंदोलनाच्या भीतीने अनेकजण आज रस्त्यावर यायला घाबरल्याने शहर व बाजारपेठेत लोंकाचा  वावर तुरळक होता. तसेच शहरात नेहमी गजबलेला पाबळ रस्ता, चौकातही वाहतूक तुरळक होती. शहरातील महाविद्यालयात विद्यार्थ्याची संख्या कमी असून  माध्यमिक, लहान मुलांच्या शाळा नेहमीप्रमाणे सुरळीत चालू आहेत.