Sun, Mar 24, 2019 16:43होमपेज › Pune › पुणे स्टेशनवर बसविले सॅनेटरी व्हेंडिंग मशिन 

पुणे स्टेशनवर बसविले सॅनेटरी व्हेंडिंग मशिन 

Published On: Feb 10 2018 8:59PM | Last Updated: Feb 10 2018 8:54PMपुणे: प्रतिनिधी

पुणे स्टेशनवर सामाजिक दायित्व निधीअंतर्गत (सीएसआर) सॅनेटरी व्हेंडिंग मशिन उपलब्ध करण्यात आले आहे. सॅनेटरी व्हेंडिंग मशिन बसविल्यामुळे महिलांच्या आरोग्याच्या अनेक समस्या कमी होण्यास यामुळे मदत होणार आहे. प्लॅटफॉर्म नंबर एक येथील महिला प्रतीक्षालयात दोन मशिन बसविण्यात आली असून एका मशिनमधून सॅनेटरी नॅपकीन मिळणार आहे, तर दुसर्‍या मशिनमध्ये तो नष्ट करण्यात येईल. पर्यावरणपूरक पद्धतीने तो नष्ट करण्याची क्षमता या मशिनमध्ये असल्याचे सांगण्यात आले. पाच रुपयांना सॅनेटरी नॅपकीन उपलब्ध करण्यात आला असून पाच रुपयाचा एक डॉलर किंवा एक रुपयाची पाच नाणी टाकून तो मिळू शकेल.

वुमन वेल्फेअर कमिटीच्या अध्यक्षा सीमा देऊस्कर, विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांच्याहस्ते या उपक्रमाचे उद्घाटन  शनिवारी करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी ठरल्यास कोल्हापूर, मिरजसह पुणे विभागातील अन्यही स्थानकात ही मशिन बसविण्यात येतील अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी दिली. दरम्यान, पुणे स्टेशनवरील स्टेशन मॅनेजर केबिनमध्ये अपंगांसाठी व्हीलचेअरची सोय करण्यात आली असून अपंग व्यक्तींनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.