Sun, Sep 23, 2018 11:55होमपेज › Pune › पुणे : बक्षीस वितरणावेळी घटना ; चौघे किरकोळ जखमी (video)

पुणे : दहीहंडीचे स्टेज कोसळले  (video)

Published On: Sep 04 2018 12:26PM | Last Updated: Sep 04 2018 12:26PMपुणे : प्रतिनिधी

बुधवार पेठेतील दहीहंडी उत्सवात स्टेजवर तुफान गर्दी झाल्याने स्टेज कोसळल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मध्यरात्री उत्सव झाल्यानंतर बक्षीस वितरण वेळी हा प्रकार घडला आहे.

बुधवार पेठ परिसरातील शुक्रवार पेठ पोलिस चौकी समोर जयशिवाजी दहीहंडी मंडळाकडून उत्सवाचे आयोजन केले होते. दहीहंडी फुटल्यानंतर बक्षीस वितरण सुरु होते. त्यावेळी कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात स्टेजवर आले. त्यानंतर काही क्षणातच स्टेज कोसळला. सुदैवाने यात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. परंतु, चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.