Mon, Mar 25, 2019 02:49
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › पुणे  : मौलानाकडून कात्रजमधील अनाथाश्रमात मुलांचे लैंगिक शोषण 

पुणे  : मौलानाकडून कात्रजमधील अनाथाश्रमात मुलांचे लैंगिक शोषण 

Published On: Jul 27 2018 10:20PM | Last Updated: Jul 27 2018 11:00PMपुणे : प्रतिनिधी 

कात्रज येथील आरके कॉलनी परिसरात असलेल्या अनाथआश्रमामध्ये तेथील मौलानाकडूनच अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषणाचा प्रकार समोर आला आहे. बालहक्क  कार्यकर्त्यांना अनाथाश्रमातून पळून जाणारी मुले मिळून आल्यानंतर त्यांच्याकडे बालकल्याण समितीसमोर मौलाना मुलांचे लैंगिक शोषण करत असल्याची हकिकत सांगितल्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मौलाना रहीम याच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डॉ. यामीनी अद्वैत अडबे ( वय ५४, बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. यामीनी अडबे या बालहक्क कार्यकर्त्या आहेत. साथी या संस्थेच्या कार्यकर्त्यांना पुणे रेल्वे स्थानकावर दोन दहा वर्षांची मुले मिळाली होती. या मुलांना त्यांनी पुण्याच्या बालहक्क समितीसमोर हजर केले होते. त्यावेळी त्यांच्याकडे जामीया अरबिया दारूल यतामा (यतीम खाना) या अनाथआश्रमाचे ओळखपत्र मिळाले. त्याबाबत त्यांच्याकडे विचारणा केल्यावर त्या दोघांनाही बिहारमधून पंधरा दिवसांपुर्वीच या अनाथआश्रमात दाखल करण्यात आले होते. तेथे मौलाना रहीम हा आमच्या सोबत वाईट काम हरकत करतात. तसेच मुलांनी विरोध केल्यास त्यांना शिवीगाळ आणि काठीने मारहाण करतो. त्यामुळे आम्ही तेथून पळून आलो आहोत असे त्यांनी सांगितले. त्यानंतर बालकल्याण समितीकडून डॉ. अडबे यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी यासंदर्भात कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी  आणि बालहक्क कार्यकर्त्यांनी अनाथआश्रमात जाऊन मुलांची सुटका केली आहे. तर हा गुन्हा पुढील तपासासाठी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.