Sat, Nov 17, 2018 21:27होमपेज › Pune › पुणे : भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचे आदेश

पुणे : भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावर जप्तीचे आदेश

Published On: Apr 28 2018 8:26PM | Last Updated: Apr 28 2018 8:26PMवाठार स्टे : पुढारी ऑनलाईन

गाळप हंगाम 2017- 18 मध्ये गाळप केलेल्या 2 लाख 83 हजार 457 लाख मे टन उसाची 47 कोटी 86 लाख 98 हजार रुपये रक्कम 14 दिवसात देणं गरजेची होती. मात्र, ही रक्‍कम थकीत ठेवल्याप्रकरणी साखर आयुक्त संभाजी कडू- पाटील यांनी राज्यातील तीन साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश दिले आहेत. 

यामध्ये पुणे जिल्ह्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखाना, सातारा जिल्ह्यातील न्यु फलटण शुगर्स हा खासगी साखर कारखाना आणि बीड जिल्ह्यातील जयभवानी सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे.

Tags : pune, pune news, bhima patas, sugar factory