Wed, Nov 14, 2018 14:37



होमपेज › Pune › पुणे वेधशाळेचे ९१ व्या वर्षात पदार्पण

पुणे वेधशाळेचे ९१ व्या वर्षात पदार्पण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





पुणे : प्रतिनिधी 

पुणे वेधशाळेचे आज ( दि. 1) 91 व्या वर्षात पदार्पण होत आहे. हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणार्‍या भारतीय हवामानशास्त्र विभागाचे कार्यालय सिमला येथून पुण्याला स्थलांतर झाले, त्याला 1 एप्रिल रोजी नव्वद वर्षे पूर्ण होत आहेत. वेधशाळेच्या कार्यालयामुळे शिवाजीनगर येथील या चौकाला सिमला ऑफिस चौक असेही संबोधले जाते.

1 एप्रिल 1928 रोजी पुणे वेधशाळा येथून प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात झाली. दुसर्‍या महायुद्धात हवामान विभागाचे मुख्यालय दिल्लीत हलविण्यात आले. स्वातंत्र्यानंतर दिल्ली येथे मुख्यालय कायम ठेवण्यात आले असले तरीदेखील पुणे वेधशाळा व सिमला ऑफिसचे महत्त्व आजही कमी झालेले नाही. दरम्यान, पुणे वेधशाळेचा अंदाज आजही देशभरातील हवामानाच्या अंदाजात प्रमाण मानला जातो, अशी माहिती देण्यात आली.

Tags : pune, pune news, Pune Observatory, 






  •