Mon, Nov 19, 2018 14:42होमपेज › Pune › तरुणांईसोबत पोलिसांनी उभारली सुरक्षित वाहतुकीची गुढी

तरुणांईसोबत पोलिसांनी उभारली सुरक्षित वाहतुकीची गुढी

Published On: Mar 18 2018 4:16PM | Last Updated: Mar 18 2018 4:15PMपुणे : प्रतिनिधी

गुढी सुरक्षिततेची... गुढी स्वयंशिस्तीची... गुढी सतर्कतेची... गुढी नियमांची... असा सुरक्षित वाहतुकीचा संदेश देत  सुरक्षित वाहतुकीची गुढी पुण्यातील वाहतुक पोलिस आणि तरुणाईने एकत्रित येऊन उभारली. वाहतुकीचे सर्व नियम पाळत स्मार्ट पुण्याची वाहतूक व्यवस्था देखील स्मार्ट करु अशी ग्वाही तरुणांनी यावेळी वाहतूक पोलिसांना दिली. वाहतूक पोलीस व अधिकाºयांनी हातामध्ये गुढी घेऊन सुरक्षित वाहतुकीविषयी जनजागृती देखील यावेळी केली.  

वाढती वाहने आणि बेशिस्त वाहनचालकांना सुरक्षित वाहतुकीचा संदेश देण्याकरीता पुणे शहर वाहतूक आणि मैत्र युवा फाऊंडेशनने सुरक्षित वाहतुकीची गुढी उभारली.  गुढीपाडव्यानिमित्त टिळक चौकात (अलका टॉकीज चौक) उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रभाकर ढमाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज पाटील, मैत्रयुवाचे अध्यक्ष संकेत देशपांडे उपस्थित होते. 

प्रभाकर ढमाले म्हणाले, पुण्यातील वाहतूक व्यवस्था चांगली होण्यासाठी सगळ््यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुण्यात ५२ लाख वाहने आहेत, त्याप्रमाणात पोलिसांची संख्या कमी आहे. त्यामुळे स्वयंशिस्तीने प्रत्येक नागरिकाने वाहतुकीचे नियम पाळून सहकार्य करायला हवे. वाहतुकीची शिस्त पाळणे हि देखील समाजसेवा आहे, असेही त्यांनी सांगितले.

संकेत देशपांडे, पुण्यातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी जर तरुणाईने पुढाकार घेतला, तर निश्चितच मोठा बदल दिसू शकतो. त्यामुळे तरुणाईला सोबत घेऊन सुरक्षित वाहतुकीची गुढी उभारण्यात आली आहे. मैत्रयुवा फाऊंडेशनच्या २७ शाखा पुण्यात आहेत. या शाखेतील मुले-मुली प्रत्येक शनिवार आणि रविवार २ तास वाहतूक पोलिसांसोबत काम करुन त्यांना वाहतूक नियंत्रणाकरीता मदत करतील, असेही त्यांनी सांगितले. 

Tags : pune, news, Youth, Gudhi padwa, Traffic Police,