Sun, Feb 23, 2020 03:20होमपेज › Pune › सोशल मीडियावर महापालिकेचे फुस्स!

सोशल मीडियावर महापालिकेचे फुस्स!

Published On: Dec 07 2017 8:41AM | Last Updated: Dec 07 2017 8:41AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

एकीकडे स्मार्ट सिटीचा डंका पिटणार्‍या महापालिकेला सोशल मीडियावर अत्यंत थंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे वैतागलेल्या संगणक आणि सांख्यिकी विभागाने महापालिकेने सुरू केलेल्या फेसबुक पेजला ‘लाईक’ करण्यासह ट्विटर हँडलला फॉलो करण्याचे प्रशासकीय आदेश कर्मचार्‍यांना दिले आहेत. त्यामुळे आता कार्यालयीन वेळेत कर्मचारी अधिकृतरित्या सोशल मीडिया वापरताना दिसल्यास आश्चर्य वाटून घेण्याची गरज नाही.

महापालिकेच्या वेगवेगळ्या सेवासुिवधांचा प्रसार आणि प्रचार वेगाने व्हावा, यासाठी पालिका प्रशासन विविध उपक्रम राबवत आहे. मात्र, यातील सोशल मीडियाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. महापालिकेने दोन वर्षांपूर्वी फेसबुक पेजसह ट्विटर हँडल सुरू केले. मात्र, त्याला तुरळक प्रतिसाद मिळत नसल्याने आता या सोशल मीडियावरील प्रचार आणि प्रसाराची जबाबदारी पालिकेच्या कर्मचार्‍यांवर सोपविण्यात आली आहे. महापालिकेच्या फेसबुक पेजसह ट्विटर हँडल जबाबदारी घेण्यासाठी खासगी सल्लागार तसेच काही कंपन्यांना पैसे देऊन त्याचे कामकाज पाहिले जात होते. तब्बल 35 लाख लोकसंख्या असलेल्या पुणे शहरात पालिकेच्या फेसबुक पेजला फक्त 10 हजार लाईक्स आहेत. तर ट्विटर हँडलचे 8 हजार फॉलोअर्स आहेत. त्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या फेसबुक पेजला ‘लाईक’ करण्यासह ट्विटर हँडलला फॉलो करण्याचे प्रशासकीय आदेशच कर्मचार्‍यान दिले आहेत. त्यामुळे सोशल मीडियामध्ये महापालिका मागे पडत असल्याने आता पालिकेच्या 18 हजार कर्मचार्‍यांना अ‍ॅक्टिव्ह राहण्यास सांगितले आहे. कर्मचार्‍यांना आलेल्या आदेशाचे पालन करणे भाग आहे. पण पैसे मोजून काम दिलेल्या खासगी सल्लागार कंपनीने काय केले असा सवाल निर्माण झाला आहे.