Tue, Nov 13, 2018 23:59



होमपेज › Pune › पीएमपीच्या सीएनजी बसेसने आठ महिन्यात घेतला नऊवेळा पेट 

पीएमपीच्या सीएनजी बसेसने आठ महिन्यात घेतला नऊवेळा पेट 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





पुणे : शिवाजी शिंदे 

अगोदरच खिळखिळी बनलेल्या पीएमपीला खरोखर ग्रहण लागले आहे की काय असे म्हणण्याची वेळ आली आहे .गेल्या आठ महिन्यात सुमारे नऊ सीएनजी बसेसने भर रस्त्यात पेट घेतलेला आहे. पेटलेल्या बहुतांशी बसेस या खासगी ठेकेदारांच्या आहेत. शॉर्ट सर्किट आणि वेळेवर मेंटनेस न केल्यामुळे या बसेस पेटल्या असल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असली तरी बस पेटण्यामागे नक्कीच  मोठे गौंडबंगाल असल्याची बाब आता समोर येऊ लागली आहे. त्यानुसार केवळ ‘इन्शुरन्सचा क्लेम’ मिळावा अशी शक्यता काही जाणकार व्यक्त करीत आहेत.

पीएमपीच्या खासगी ठेकेदाराच्या ताफ्यात असलेली सीएनजी बसने गुरूवारी नगर रस्त्यावर असलेल्या ऑरबिट मॉल समोरे अचानक पेट घेटला त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेच शिवाय पेटत्या बसमधून कशाही पध्दतीने उड्या मारून प्रवाशी बाहेर पडले आहेत. त्यामुळे जीवीतहानी झाली नाही. मात्र भर रस्त्यात सीएनजीच्या बसेसने  पेट घेणे ही नित्याचीच बाबी झालेली असल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांच्या जीवाशी पीएमपी प्रशासन आणि खासगी ठेकेदार खेळताहेत काय असे आता नागरिक म्हणू लागले आहेत.

समितीचा अहवाल अजुनही गुलदस्त्यात: गौडबंगाल वाढले

पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या कार्यकालात सीएनजी बस का पेट्ल्या याची चौकशी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबा आजरी यांच्या अध्यक्षतेखाली एका समिती स्थापन केली होती. समिती स्थापन होऊन आता अनेक महिन्यांचा कालावधी लोटला आहे .मात्र या समितीने अजुनही आवश्यक असलेला अहवाल पीएमपी प्रशासनाकडे सादर केलेला नाही. मात्र प्राथमिक स्तरावर विचार केला असता बसेसची वेळेवर देखभाल दुरूस्ती न होणे त्याचप्रमाणे शॉर्ट सर्किटमुळे या बसेस पेटल्या असल्याचे  प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबा आजरी यांनी सांगितले.

सीएनजी बसेसच  प्रत्येक वेळी का पेट घेत असतात. याबबत मात्र अजुनही या समितीने अहवाल प्रशासनानाकडे सुपूर्त केलेला नाही. त्यामुळे अहवालात समितीच्या सदस्यांनी नक्की काय मांडणी केलेली आहे. ही बाब अजुनही गुलदस्त्यातच आहे .परिणामी या अहवालाबाबतही गौडबंगाल वाढलेले आहे. असे म्हणण्याची वेळ आली आहे. वास्तविक पाहता मागील आठ  महिन्यात नऊ सीएनजी बसेसने पेट घेतल्यानंतर या बसेस पेटण्यामागे नक्की काय कारण आहे .याचा लवकरात लवकर शोध घेणे हे स्थापन केलेल्या समितीचे काम होते. विशेष म्हणजे तत्कालीन पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल लागलीच येणे गरजेचे होते. मात्र त्यामध्ये जाणीवपूर्वक चालढकल केली आहे काय, की या ठेकेदारांच्या बसेस असल्यामुळे त्यांना या चौकशी अहवालात वगळावयाचे आहे काय असाही सवाल पुढे येऊ लागला आहे.

शॉर्ट सर्किट आणि देखभाल दुरूस्ती न केल्यामुळे बस पेटली    

पीएमपीचे मुख्य अभियंता शिवाजी जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार शॉर्ट सर्किट आणि बसची वेळेवर देखभाल आणि दुरूस्ती न केल्यामुळे सीएनजी बसेस पेट घेत असल्याची बाब पुढे आलेली आहे. याबबत संबधीत ठेकेदारांना समज देण्यात येणार आहे.

इन्शुरन्ससाठी ठेकेदारांनी बसेस पेटविल्या काय ?

पीएमपीच्या सेवेत बहुतांशी खासगी ठेकेदारांच्या सुमारे 653 बसेस आहेत. या बसेसमध्ये सुध्दा सीएनजीवरील बसेसचे प्रमाण जास्त आहे. मात्र पीएमपी प्रशासनापेक्षा खासगी ठेकेदाराच्याच सीएनजीवरील गॅसवर असलेल्या बसेस जास्त प्रमाणात पेट घेत असल्याचे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. या  बसेस पेटत आहेत की इन्शुरन्ससाठी पेटविल्या जात आहेत काय  अशी चर्चा आता सुरू झाली आहे .कारण पेटलेल्या बसेस या खासगी ठेकेदारांच्याच जास्त आहेत. आर्युमान झालेल्या बसेसना सीएनजी गॅस आहे की काय आणि त्याचा इन्शुरन्स मिळण्यासाठी अप्रत्यक्षरित्या या बसेस पेटविल्या जात आहेत का? असा प्रश्‍न सवाल आता पुढे  आलेला आहे.

 

Tags : pune, pune news, Pune Municipal Corporation, CNG Bus, Fire, 






  •