Tue, Mar 19, 2019 20:27होमपेज › Pune › पुणे-मुंबई ‘एक्सप्रेस वे’ अडीच तास ठप्प

पुणे-मुंबई ‘एक्सप्रेस वे’ अडीच तास ठप्प

Published On: Apr 21 2018 1:19AM | Last Updated: Apr 21 2018 12:49AMलोणावळा : वार्ताहर

पुणे- मुंबई एक्सप्रेस वे वर खंडाळा बोर घाटात अमृतांजन पुलाच्या पुढे कंटेनर पलटल्याने पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक अडीच तासांहून अधिक काळ ठप्प झाली होती.शुक्रवारी सकाळी 8 च्या सुमारास एक्सप्रेस हायवेच्या पुणे मुंबई लेनवर अमृतांजन पुलाच्या पुढे उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक कंटेनर रस्त्याच्या मधोमध आडवा झाला. यामुळे पुण्याकडे जाणार्‍या लेनवर वाहनांच्या सुमारे 3 किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. 

बोरघाट महामार्ग पोलीस आणि आयआरबीने क्रेन च्या मदतीने 10 च्या सुमारास हा कंटेनर बाजूला काढला.  दरम्यान, मुंबईकडून पुण्याकडे येणार्‍या वाहतुकीवरही या अपघाताचा परिणाम झाल्याने पुण्याकडे येणारी वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती. अखेर साडे दहाच्या सुमारास दोन्ही लेनवरील वाहतूक पूर्ववत झाली.दरम्यान, कंटेनर पलटी झाल्याने निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. या कोंडीमुळे अनेकांच्या कामांचे नियोजन अक्षरशः फसले.

Tags : Pimpri, Pune, Mumbai, Expressway, jammed, two, half, hours