Fri, Apr 26, 2019 03:22होमपेज › Pune › अनेक वैशिष्ट्यांनी सज्ज असणार पुणे मेट्रो

अनेक वैशिष्ट्यांनी सज्ज असणार पुणे मेट्रो

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 14 2018 10:47PMपिंपरी : प्रतिनिधी

अनेक वेगळ्या संकल्पना घेऊन महामेट्रो पुणेकरांसाठी 2021 पर्यंत पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी मार्ग खुला करणार आहे, अशी माहिती पुणे मेट्रो प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार शशिकांत लिमये यांनी येथे दिली.

चिंचवड येथे महामेट्रोवर आयोजित परिसंवादात लिमये बोलत होते. या वेळी पुणे मेट्रो प्रकल्प कमिटीचे सदस्य रमेश राव, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक सुनील म्हस्के, बिमल रावत, अनघा रत्नपारखी, विलास गावडे, वर्षा पांगारे, संजय सोंडेकर, प्रदीप वाल्हेकर, उज्ज्वल जोशी आदी उपस्थित होते. लिमये म्हणाले, मेट्रोच्या वनाज ते रामवाडी या मार्गिकेवरील काम मोठ्या प्रमाणात सुरू असून, यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यास अथवा या मार्गिकेदरम्यान बांधकामाच्या जागी काही अपघात झाल्यास महामेट्रोकडून जलद कृती दल तैनात करण्यात आले आहे. या दलामार्फत अनेक सुविधा पुरविण्यात येत आहेत. 

प्रवाशांना भुयारी मार्गाचा वापर करणे सोपे जावे यासाठी त्या मार्गावरील इतर वाहतूक सुविधांना एकमेकांशी जोडले जाणार आहे (बस, रेल्वे). पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक दिसून येईल अशा पद्धतीने मेट्रो स्थानकांची रचना, मेट्रो मार्गावर नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी सहयोग केंद्र, पहिल्या मेट्रो स्टेशनला सोलर सिस्टीम, अपघात व वाहतूक नियंत्रणासाठी जलद कृती दल, असणार आहे. अडथळा ठरणार्‍या वृक्षांचे पुनर्रोपण होणार आहे. संजय सोंडेकर यांनी आभार मानले.