Tue, Apr 23, 2019 05:34होमपेज › Pune › कासारवाडी वगळून आठ जागा देण्यास मंजुरी

कासारवाडी वगळून आठ जागा देण्यास मंजुरी

Published On: Feb 06 2018 2:10AM | Last Updated: Feb 06 2018 1:54AMपिंपरी : प्रतिनिधी  

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील 9 जागांची मागणी महाराष्ट्र रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने महापालिकेकडे केली आहे. त्यापैकी कासारवाडीतील मॅक्स न्युरो रुग्णालयामागील जागा न देण्याच्या उपसूचनेसह उर्वरित 8 जागा 30 वर्षे भाडेतत्त्वावर देण्यास पिंपरी महापालिकेने सर्वसाधारण सभेने सोमवारी मंजुरी दिली. पुणे मेट्रोचे दापोडी ते मोरवाडी, पिंपरी मार्गावर काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी मेट्रो वाहनतळ, मल्टीलेव्हल पार्किंग विकसित करणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र रेल कॉर्पोरेशनने पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील जागांची मागणी महापालिकेकडे केली होती.

यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादीचे श्याम लांडे यांनी कासारवाडीतील जागेची मेट्रोला गरज नसून, ती जागा मेट्रोला न देण्याची मागणी केली. मनसेचे सचिन चिखले यांनी पहिल्या टप्प्यात मेट्रो पिंपरी ते निगडीपर्यंत न्यावी. त्यासाठीच्या डीपीआर खर्चास अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणी केली. भाजपाचे संदीप वाघेरे यांनी पिंपरी कॅम्पशेजारील जागेत नियोजित कत्तलखान्यास नागरिकांचा कडाडून विरोध झाल्याने तो रद्द करण्यात आला. त्या ठिकाणी वाहनतळ उभारण्याची उपसूचना मांडली. 

 उपसूचना मान्य करून उर्वरित 8 जागा मेट्रोस देण्यास महापौर काळजे यांनी मान्यता दिली.  या 8 जागांचा आकार एकूण 2 लाख 15 हजार 765.78 चौरस फूट आहे. या जागा 30 वर्षे भाडेकरारावर महारेल कॉर्पोरेशनला देण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक जागेसाठी वेगवेगळा भाडेदर आहे. त्यानुसार 30 वर्षांसाठी एकूण 27 कोटी 89 लाख 30 हजार 358 रुपये भाडे महापालिकेस मिळणार आहेत.