होमपेज › Pune › इथिओपियाच्या धावपटूंचेच वर्चस्व

इथिओपियाच्या धावपटूंचेच वर्चस्व

Published On: Dec 04 2017 1:36AM | Last Updated: Dec 04 2017 12:18AM

बुकमार्क करा





पुणे : प्रतिनिधी

32 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये पुरुष आणि महिलांच्या मुख्य शर्यतीत इथिओपियाच्या धावपटूंनी आपले वर्चस्व गाजवले. भारतीय गटामध्ये पुरुष गटात करणसिंग आमी, तर महिला गटात संपदा बुचडे या पुण्याच्या खेळाडूंनी बाजी मारली.

पुरुषांच्या 42 किलोमीटरच्या मुख्य शर्यतीत इथिओपियाच्या गेताचू बेशा याने 2 तास 15 मिनिट 9 सेकंदांच्या वेळेसह अव्वल स्थान पटकावले. झेलालेम लेमा डिलेमा (2.15.34), देवेजे कसाव (2.17.24) हे इथिओपियाचे खेळाडू अनुक्रमे दुसरे आणि तिसरे आले. या गटातील पहिले सहा खेळाडू आणि पहिल्या दहांपैकी आठ खेळाडू इथिओपियाचे आहेत. महिलांच्या गटात इथिओपियाची तिसासूआ बॅसाझीन विजेती ठरली.

तिने 1 तास 23.40 मिनिटे अशी वेळ दिली. इथिओपियाचीच आगेर बेलेव (1.15.33) दुसरी, तर केनियाची दसकॅलिया जेपकोगेल (1.16.58) तिसरी आली. भारतीय पुरुषांच्या 42 किलोमीटर शर्यतीत पुण्याच्या करणसिंग याने 2 तास 28.01 मिनिटांच्या वेळेसह पहिले स्थान पटकावले. किशोर गव्हाणे याने 2 तास 29.26 सेकंदांची वेळ नोंदवीत द्वितीय क्रमांक आणि दादासाहेब खिलारे याने 2 तास 40.27 सेकंदांची वेळ नोंदवीत तिसरा क्रमांक पटकाविला. 

भारतीय महिलांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये पुण्याची संपदा बुचडे हिने 1 तास 23 मिनिटे 40 सेकंदांची वेळ नोंदवीत अव्वल ठरली. विनया मालुसरे 1 तास 25.40 सेकंदांची आणि निकिता गोयल 1 तास 30. 15 सेकंदांची वेळ नोंदवीत या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान प्राप्त केले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे ः 10 किलोमीटर ः पुरुष ः स्वप्नील सावंत (33.08 सेकंद), संदीप सिंग (33.11 सेकंद), किशोर जाधव (33.23 सेकंद). मुली ः प्रियांका चावरकर (39.45 सेकंद), अंकिता कोळपे (43.11 सेकंद), पूजा शिराडोले (43.12 सेकंद). 5 किलोमीटर ः पुरुष ः प्रकाश देशमुख (16.19 सेकंद), श्रीकांत कोलदरे (16.23 सेकंद), सौरभ अनिल (16.33 सेकंद) . महिला ः सायली गांजले (21.42 सेकंद), प्रज्ञा गवळी (26.28 सेकंद), उत्कर्षा खोमणे (27.26 सेकंद).