Wed, Nov 14, 2018 15:12



होमपेज › Pune › आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन, इथिओपियाच्या धावपटूंचेच वर्चस्व

आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन, इथिओपियाच्या धावपटूंचेच वर्चस्व

Published On: Dec 03 2017 2:20PM | Last Updated: Dec 03 2017 2:20PM

बुकमार्क करा





पुणे : प्रतिनिधी

३२ व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये पुरूष आणि महिलांच्या मुख्य शर्यतीत इथिओपियाच्या धावपटूंनी आपले वर्चस्व गाजवले. भारतीय गटामध्ये पुरुष गटात करणसिंग आमी तर, महिला गटात संपदा बुचडे या पुण्याच्या खेळाडूंनी बाजी मारली.

पुरुषांच्या 42 किलोमीटरच्या मुख्य शर्यतीत इथिओपियाच्या गेताचू बेशा याने 2 तास 15 मिनिट 9 सेकंदाच्या वेळेसह अव्वल स्थान पटकावले. झेलालेम लेमा डिलेमा (2.15.34), देवेजे कसाव (2.17.24) हे इथिओपियाचे खेळाडू अनुक्रमे दुसरे आणि तिसरे आले. या गटातील पहिले सहा खेळाडू आणि पहिल्या दहापैकी आठ खेळाडू इथिओपियाचे आहेत. महिलांच्या गटात इथिओपियाची तिसासूआ बॅसाझीन विजेती ठरली. तिने 1 तास 23.40 मिनिटे अशी वेळ दिली. इथिओपियाचीच आगेर बेलेव (1.15.33) दुसरी तर, केनियाची दसकॅलिया जेपकोगेल (1.16.58) तिसरी आली आहे. भारतीय पुरुषांच्या 42 किलोमीटर शर्यतीत पुण्याच्या करणसिंग याने 2 तास 28.01 मिनिटांच्या वेळेसह पहिले स्थान पटकावले. किशोर गव्हाणे याने 2 तास 29.26 सेकंदाची वेळ नोंदवित व्दितीय क्रमांक आणि दादासाहेब खिलारे याने 2 तास 40.27 सेकंदाची वेळ नोंदवित तिसरा क्रमांक पटकाविला. 

भारतीय महिलांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये पुण्याची संपदा बुचडे हिने 1 तास 23 मिनिटे 40 सेकंदाची वेळ नोंदवित अव्वल ठरली. विनया मालुसरे 1 तास 25.40 सेकंदाची आणि निकिता गोयल 1 तास 30. 15 सेकंदाची वेळ नोंदवित या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान प्राप्त केले.