Tue, Sep 25, 2018 08:48होमपेज › Pune › मला चित्रपटसृष्टीतून बाजूला केले याची खंत : राजदत्त

मला चित्रपटसृष्टीतून बाजूला केले याची खंत : राजदत्त

Published On: Jan 19 2018 1:55AM | Last Updated: Jan 19 2018 1:14AMपुणे : प्रतिनिधी

माध्यम किती सशक्त असू शकत, याची कल्पना मला चित्रपटसृष्टी मध्ये पाऊल टाकल्यानंतर आली. राजा परांजपे, ग. दी. माडगुळकर, भालजी यांच्याकडून मी शिकत गेलो. यांच्या कर्तृत्वाची उंची आकाशाला भिडणारी आहे, त्यांच्या सावलीत मी मोठा झालो. आजच्या चित्रपटसृष्टीच्या तुलनेत मी थोडा काळाच्या बाजूला झालो आहे. आज मला चित्रपटसृष्टीतून बाजूला केले, याची खंत आणि सल आहे, अशी खंत ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी व्यक्त केली.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप सोहळ्यात ‘पिफ डिस्टिंग्विश्ड पुरस्कार’ प्रदान करून ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा गौैरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे मुख्य सचिव नितीन गद्रे, ‘पिफ’चे संचालक डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते.

राजदत्त म्हणाले, आज मला या चित्रपटसृष्टीने बाजूला जरी केले असले, तरी या पुरस्काराने मला थोडी ऊर्जा प्राप्त झाली आहे.  चित्रपट ही अशी गोष्ट आहे जिथे भाषा, रंग, रूप यांची गरज नसते. पृथ्वीवरच्या निरनिराळ्या भाषेतला चित्रपट आम्ही, प्रेक्षक तन्मयतेने पाहतो. त्यामुळे, विश्‍वबंधुत्व जपणारे फक्त चित्रपट पाहायला येणारे आणि परीक्षण करणारे आहे, असेच वाटते.

तावडे पुण्यात यायला घाबरतात...?

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची गेल्या काही महिन्यापासून पुण्यातील सांस्कृतिक तसेच शैक्षणिक कार्यक्रमांना अनुपस्थिती राहत आहेत. शासनाशी संलग्नित असणार्‍या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांची हजेरी लागणे अपेक्षित होते. मात्र, विनोद तावडे यांनी या महोत्सवाला देखील दांडी मारल्याने सांस्कृतिक कार्यमंत्री पुण्यात यायला घाबरतात का? अशा चर्चेला उधाण आले आहे.