होमपेज › Pune › चांगले रस्ते हवे असल्यास, टोल भरावाच लागेल : नितीन गडकरी

चांगले रस्ते हवे असल्यास, टोल भरावाच लागेल : नितीन गडकरी

Published On: Jun 01 2018 5:02PM | Last Updated: Jun 01 2018 5:19PM



पुणे : प्रतिनिधी

देशातील नागरीकांना चांगले रस्ते व सुवीधा हव्या असल्यास त्यांना टोल हा भरावाच लागेल, असे केंद्रीय रस्ते वहातूक व बंदरे विकास मंत्री नितीन गडकरी म्‍हणाले.  पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

एन डी ए सरकारच्या चार वर्षाचा लेखाजोखा मांडण्याकरीता गडकरी आज शहरात आले होते. पुर्वी रस्त्यांची निर्मीती ही रोज २ ते ७ किलोमीटर होती, तीच आज २७ किमी आहे, पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाच्या कंत्राटदाराला टोल ची वसुली करण्याचा कार्यकाळ २०४५ पर्यंत वाढवण्यात आला आहे व भविष्यात चार चाकी वहानाला एक हजार रुपये टोल भरावा लागेल, यावेळी सदर रस्त्यांचे पैसे पुर्ण वसूल झालेले असताना कंत्राटदाराला वाढीव दराने मुदत वाढ का दीली, असा प्रश्न विचारला असता, गडकरी म्हणाले, कुठल्याही महामार्गाची निर्मिती केल्यानंतर प्रवास करणार्‍या नागरिकांची, ईंधन व वेळेची मोठी बचत चांगले महामार्ग बांधुनच होणार, व हे काम करण्याकरिता पैसे लागतात, खर्च होणारा पैसा हा टोल च्या माध्यमातुन वसुल केला जातो व पुढची कामे करता येतात. मात्र गडकरी यांनी पैसे वसुल झालेल्या पुणे-मुंबई एक्सप्रेसवे च्या कंत्राटदाराला टोल वसुल करण्याकरिता मुदतवाढ का दिली, याचे उत्तर देण्याचे टाळले. तसेच यावेळी सरकारने रस्त्यांबाबतची सर्व नवीन कामे ही मुदती आधीच पुर्ण करणार असल्याची ग्वाही दीली. 

वाढत्या ईंधनांच्या दराबाबत बोलताना ते म्हणाले की, आपण आठ लाख कोटी रुपयांचे ईंधन आयात करतो, आयात कमी करण्याकरिता ईथेनाँल मीश्रीत ईंधनाचा वापर लवकरच मोठ्या प्रमाणावर सुरु होईल याच बरोबर कमी दरात ईलेक्ट्रीक वहाने लवकरच नागरिकांना मिळतील. या वाहनांचा वापर जेव्हा नागरिक सुरु करतील तेव्हा इंधनाची मोठी बचत होईल व ईंधन खर्च कमी होईल, त्यासाठी या वहांनांवर निर्मिती कर कमी ठेवण्यात आला आहे, जेणेकरुन कमी किंमती मध्ये ही वहाने नागरीकांना उपलब्ध होतील. 

गडकरी यांनी केंद्र सरकारने देशातील नागरिकांकरिता सुरू असलेल्या अनेक योजनांची माहिती दिली व देशाची आर्थिक स्‍थिती किती भक्कम आहे, हे पटवुन दिले.  नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुका मध्ये भाजपची हार झाली यावर बोलताना गडकरी म्हणाले, विरोधी जिंकले तर ईव्हीएम चांगले व हार झाली तर ईव्हीएम मध्ये दोष, हे योग्य नाही, जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे, पण विकासाच्या बाबीं मध्ये विरोधी पक्षांनी राजकारण करु नये कारण विकास देशाचा होत आहे, हे विसरु नये.