Fri, Jul 19, 2019 18:26होमपेज › Pune › पुणे : देहूरोड येथे पाच वाहनांचा अपघात

पुणे : देहूरोड येथे पाच वाहनांचा अपघात

Published On: Aug 20 2018 12:25PM | Last Updated: Aug 20 2018 12:24PMदेहूरोड : वार्ताहर

मुंबई-पुणे महामार्गावर देहूरोड येथे उड्डाण पुलाखालील अरूंद रस्त्यावर भरधाव ट्रेलरची धडक बसून पाच वाहने एकमेकांवर आदळली. या विचित्र अपघातात कुणीही जखमी  झाले नाही. ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याचे चालकाने सांगितले. 

आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास घटना घडली. उड्डाण पूलाच्या कामामुळे याभागात वाहतूक तंग असते. आज सकाळीही वाहतूक संथ होती. त्यामुळे कुर्ला-सांगोला एसटी बस (एमएच१४ बीटी ४७११) थांबली होती. तिच्या मागे तीन मोटारी थांबल्या होत्या. मागुन भरधाव आलेल्या ट्रेलरची (जीजे१२ एझेड १४४) या वाहनांना जोरदार धडक बसली. 

उतार रस्त्यामुळे वारंवार ब्रेक लावावा लागला. त्यामुळे ब्रेक निकामी झाले व अपघात घडला, अशी माहिती चालक साहिल खान याने दिली. अपघातात आयट्वेंटी (एमएच १४ इएच ४७८२), स्विफ्ट (जीजे०६ केएच २०३४), अल्टो (एमएच १४ डीटी ०२५७) तसेच एसटीचे आणि ट्रेलरचे नुकसान झाले आहे.